Description
आपल्या तीन वर्षाच्या मुलाच्या आजारपणातून निघालेल्या निदानातून असे लक्षात आले की, तो आता काही वर्षांचाच सोबती आहे. ते ऐकून हेरॉल्ड कुशनर मुळापासून हादरले. प्रथम त्यांच्या मनात परमेश्वरा, हे असं का ? असा प्रश्न उभा राहिला. जेव्हा आपल्यावर एखादे संकट कोसळते, तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न थैमान घालू लागतात. रब्बाय कुशनर यांनी आपल्या मनात थैमान घालणाऱ्या प्रश्नांवर सखोल चिंतन केले. एकूणच, या दु:खाच्या सोबतीतून आलेले शहाणपण, ज्ञान, कुशनर यांनी रब्बाय, पालक, वाचक, आणि सरतेशेवटी माणूस या नात्यांनी काळजीपूर्वक शब्दबद्ध केले. ”जेव्हा चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात” या ग्रंथाची आजवर अनेकांनी नक्कल केली. पण या पुस्तकाचे अद्वितीय स्थान कोणालाही घेता आले नाही. या उत्कृष्ट दर्जाच्या या पुस्तकातून तर्कानुसारी विचारांची साधी सरळ मांडणी वाचकांना विलक्षण अंतर्मुख करते. दु:खी असताना तर हे पुस्तक वाचकाचे सांत्वन करते.
”हृदयाला भिडणारे, कमालीच्या समंजसपणे व करुनेने लिहिलेले हे पुस्तक वाचकांच्या मनाचा कब्जा घेते. ज्यांना दु:खाशी, वेदनांशी दोन हात करावे लागतात, त्या सर्वांसाठी हे पुस्तक जिवलग मित्राप्रमाणे हितगुज करेल. ”
”तुम्ही धार्मिक असा वा नसा, अगदी सहजपणे व साधेपणाने संवाद साधणारे हे पुस्तक तुमच्या मनाचा ठाव घेईल. ज्यांना समस्येला थेट सामोरे जाता येत नाही, अशांना तर हे पुस्तक आपला मदतीचा हात देईल.
”आयुष्यातील वादळे समजून घेण्यासाठी प्रस्तुतचे पुस्तक आपल्याला अंतर्बाह्य हलवणारा पण मानवचित मार्ग दर्शवते. ”

Reviews
There are no reviews yet.