Description
”ज्या कॉर्पोरेट अधिकाऱ्यांना आणि व्यावसायिकांना यशस्वी व्हायचं आहे आणि स्वतःची प्रगतीही करून घ्यायची आहे आणि तीही फक्त साधनसामग्रीच्या बाबतीत कायमच अभावग्रस्त असणाऱ्या भारतासारख्या देशांमध्येच फक्त नाही, तर जगातल्या सर्वच बाजारपेठांमध्ये त्यांना हे साध्य करायचे आहे, त्यांना हे पुस्तक उपयुक्त वाचनापलीकडेही आणखी बरंच काही देऊन जातं!”
– रतन टाटा, चेअरमन, टाटा ग्रूप
”कॉर्पोरेट क्षेत्रामधले अधिकारी आणि व्यावसायिक मंडळी यांनी हे पुस्तक अवश्य वाचावं.”
– किशोर बियाणी, सी. ई. ओ.,फ्युचर ग्रूप
”एकविसाव्या शतकातल्या व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या दृष्टीनं कामासाठी उद्युक्त करणारं आणि त्याचबरोबर त्यांना गुंतवूनही ठेवणारं पुस्तक
– काल्स घोसन, सी.ई.ओ.,रेनॉ-निस्सान.
”हे पुस्तक कल्पक भारतीय व्यावसायिंकासाठी एका उत्तम मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतं आणि अनेक भारतीय कॉर्पोरेट अधिकाऱ्यांना त्यांनी त्यांच्या देशात केलेल्या उपाययोजनांना आणि कल्पक संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त करून देतं.
-डॉ. राणा कपूर, संस्थापक, मॅनेजिंग डायरेक्टर आणि सी.ई.ओ., येस बँक
”जुगाड इनोव्हेशन’ हे पुटक निमनस्तरीय समाजाची ताकद, प्रत्येक गोष्ट स्वतः कारण्याबाबतीतला एका विशिष्ट पिढीचा विचार; कमी खर्चात, स्वस्त,जलद आणि साध्य पद्धतीने केलेलं संशोधन; अशा अनेक बाबतींमध्ये बऱ्याचशा कंपन्यांच्या सी.ई.ओ.चे डोळे उघडण्याचं काम करतं.”
– जॉर्ज एफ.कॉलनी, सी.ई.ओ., फॉरेस्ट रिसर्च
”सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी वाचायलाच हवं असं पुस्तक म्हणजे ‘जुगाड इनोव्हेशन!’ भारतात दीर्घ काळासाठी दूरदृष्टीचा वापर करून व्यवसायात यशस्वी होण्यासाठी त्यांना या मार्गदर्शक अशा पुस्तकांचा निश्चितच उपयोग होईल.”
-डॉ.आर्मिन ब्रुक, मॅनेजिंग डायरेक्टर आणि सी.ई.ओ., सिमेन्स लिमिटेड, साऊथ एशिया क्लस्टर.
”जुगाड संशोधन ह्या विषयाचा विविध अंगांनी विचार करणारं आणि अतिशय उत्तम तऱ्हेनं लिहिलेलं पुस्तक… पानापानांवरच उत्कंठावर्धक विवेचन… उपाययोजनांचा आणि महत्त्वपूर्ण माहितीचा अमूल्य खजिना.
– इंडिया टुडे
Reviews
There are no reviews yet.