Description
समाजातील लंपट बुवा – बाबा – बापूंना मोठी प्रतिष्ठा आणि अमाप पैसा मिळाला की त्यांचं अंतिम ध्येय असतं ते विविध महिलांना उपभोगने. पण अशा ढोंगी बुवा- बाबांना ओळखण्यात अनेकांचा गोंधळ होतो.
- हे बुवा -बापू महिला भक्तांना कसे भजनी लावतात ?
- त्यांना कोणती प्रलोभने देतात ?
- तरुण महिला अशा वयस्कर बाबांच्या प्रलोभनांना का बळी पडतात ?
- हे ढोंगी बुवा-बाबा समाजातील सर्वच घटकातील स्त्रियांचे कशाप्रकारे शारीरिक आर्थिक शोषण करतात ?
- कसे महिलांना जाळ्यात ओढतात ?
- अशा बुवा-बाबांना कसे ओळखायचे ?
- त्यांना उघडे कसे पाडायचे ? त्या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे हे पुस्तक आहे.
अनेकांच्या जीवनात त्यांच्यासमोर अशा काही घटना घडल्या असल्याने त्या खऱ्या की खोट्या या द्विधा मनस्थितीत असे लोक असतात. प्रा. श्याम मानवांना शुक्रदास, सत्यदेव, व्यंकटनाथ, हजरतबाबा करामत अली, स्वामी विद्यानंद, गिरिपुंजे, कृपालूबाबा, सुंदरदास अशा अनेक नावाजलेल्या बाबा – महाराजांचे भांडाफोड़ करताना आलेले अनुभव समजून घेण्यासाठी आणि आसाराम – रामरहीम पर्यंत सर्व बाबांच्या लोकांना फसविण्याच्या पद्धति प्रत्यक्ष उदाहरणांसह जाणून घेण्यासाठी महत्त्वाचा ग्रंथ., कारण हे काल्पनिक लिखाण नाही तर लेखकाने स्वतः अनुभवलेल्या घटना आहेत. या घटनांमधील अनेक पात्रे तर आपल्याही ओळखीची असतील.

Reviews
There are no reviews yet.