Description
ह्या पुस्तकात जागतिक कीर्तीचे लिडरशिप गुरू आणि मंक हू सोल्ड हिज फेरारी ह्या जगदविख्यात पुस्तकाचे लेखक, रॉबिन शर्मा ह्यांनी तुमच्या मुलांमधील नैसर्गिक नेतृत्व क्षमता काशी वाढवायची व त्याच बरोबर ह्या प्रक्रियेमध्ये तुमचे स्वत:चे जीवन कसे समृद्ध करायचे ह्याची अतिशय सोपी आणि परिणामकारक तंत्र सांगितली आहेत.
ह्या विषयातले अतिशय सखोल ज्ञान आणि अंत: प्रेरणेने रॉबिन शर्मांनी आपल्याला कौटुंबिक नेतृत्वाचे पाच प्रावीण्याचे धडे आणि व्यावहारिक तंत्र सांगितली आहेत, जी आपल्याला खालील गोष्टीत मदत करतात.
- तुमच्या मुलांमधील सर्वोत्तम कौशल्य आणि सर्वोच्च क्षमता त्यांच्यामधून बाहेर काढण्यासाठी.
- तुमच्या प्रियजनांमधील आणि तुमच्यातील नाते संबंध टिकविण्यासाठी.
- तुमच्या मुलांचे व्यक्तीमत्व कणखर बनवण्यासाठी आणि चातुर्यासाठी प्रेरणा मिळेल.
- तुमच्या मुलांना मोठी स्वप्न कशी बघायची आणि खरे यश कसे संपादन करायचे हे शिकवण्यासाठी.
- तुमच्या जीवनात संतुलन परत आणण्यासाठी आणि शांतमय, साधे आणि समाधानी जीवन जगण्यासाठी.
- जीवनातला खरा आनंद आणि महत्त्वाच्या गोष्टी मिळवण्यासाठी.


Reviews
There are no reviews yet.