अनिष्ट प्रथा

90.00

1 in stock

पुस्तकाचे नाव अनिष्ट प्रथा
लेखक उत्तम कांबळे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ८०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १२० ग्रॅम

Description

अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा यांवर यापूर्वी आणि आताही सातत्याने लेखन होत आहे. काही अनिष्ट प्रथा बदलत्या काळानुसार नव्या चेहऱ्याने पुढे येतात. त्यांची दखल घेऊन त्यांच्याविरोधी प्रबोधन करणे, या प्रथांचे स्वरूप स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठीच माझाही एक छोटासा प्रयत्न आहे.   staraat

जो समाज ज्ञानापासून, शिक्षणापासून शतकानुशतके वंचित राहिला, त्या समाजात अनिष्ट प्रथांचे प्रचलन अधिक आणि अधिक निष्ठेने चालू राहाणे स्वाभाविक होते. एका बाजूने आदिम पातळीवरच्या दैवतांविषयीचे भय आणि दुसऱ्या बाजूने स्वार्थ परायणता बाळगणारा जो ‘वरचा’ समाज आहे, त्याने धूर्तपणे या उग्र दैवतांच्या तृष्टीसाठी अनिष्ट प्रथांचा वापर दलितांना या ना त्या प्रकार बळी देऊन केल्याची असंख्य उदाहरणे इतिहासाच्या पानोपानी आढळतात. तसेच आजही खेडोपाडी अशा घटना घडत असल्याची वार्ता आपण सततच वाचीत असतो. कधी कधी तर हा तथाकथित वरचा समाज या आदिम श्रद्धेतून मुक्त असूनही आपल्या अत्यंत हीन स्वार्थासाठी किंवा पशूलाही लाजवणाऱ्या वासनांधतेच्या तृप्तीसाठी दलितांच्या  स्तरात टिकून राहिलेल्या आदिम श्रद्धेचा लाभ नीच वृत्तीने करून घेत असतो.       

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अनिष्ट प्रथा”

Your email address will not be published. Required fields are marked *