वक्तृत्व कला आणि साधना

180.00

9 in stock

पुस्तकाचे नाव वक्तृत्व कला आणि साधना
लेखक प्रबोधनकार ठाकरे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १६८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २३९ ग्रॅम

Description

अनेक नामांकित देशी-परदेशी वक्त्यांची भाषणे मी ऐकत असे नि ऐकलीही होती. कित्येकांची तर ध्वनिलिखितही केलेली होती. प्रत्येकाची लकब निराळी. काही केवळ विद्वत्तेच्या प्रदर्शनासाठी बोलत. त्यांची व्याख्याने श्रोते पुराणिकाच्या ठराविक धाटणीसारखी फक्त भक्तिभावाने ऐकत, ऐकत म्हणजे काय? तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने बाहेर सोडीत. कसं काय झालं व्याख्यान? तर वक्ता विद्वान, विलक्षण अभ्यासू. आपल्याला काय समजणार त्यात, हा परिणाम. कित्येकांची भाषणे मधुरमधुर शब्दांचा नुसता सडा. श्रोत्यांनी तो नुसता ऐकावा नि कौतुक करीत सभागृहाबाहेर पडावे. कित्येकांची भाषणापेक्षा हातवारेच जबरदस्त. असले नाना प्रकार पाहून वक्तृत्व-परिणामकारक वक्तृत्व असावे कसे आणि ते कमावण्यासाठी उमेदवारांनी स्वाध्यायाची, आवाजाच्या कमावणीची, हावभाव नि मुद्राभिनयाची कसकशी तयारी केली पाहिजे, इत्यादी अनेक मुद्द्द्यांची मी चार-पाच वर्षे टिपणे करीत होतो, आणि त्याविषयीची पाश्चात्य पुस्तके अभ्यासित होतो.
– प्रबोधनकार के. सी. ठाकरे

                                                                     (‘माझी जीवनगाथा’ तून)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वक्तृत्व कला आणि साधना”

Your email address will not be published. Required fields are marked *