Description
प्रदिपकुमार लक्ष्मण कांबळे
कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या बहे या संपन्न खेडेगांवात जन्म दिनांक २० नोव्हेंबर १९६४. महाविद्यालयीन शिक्षण इस्लामपूर येथे एम. ए. (अर्थशास्त्र) डी. ए. ई. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर २५ वर्षे राज्य परिवहन सेवेत कार्यरत. सांगली, इस्लामपूर, शिराळा, स्वारगेट, पुणे या ठिकाणी कामगिरी उत्कृष्ठ कामगिरी व सेवेबद्दल येडेमच्छिंद्र व बोरगांव या ठिकाणी मा. ना. श्री. जयंतरावजी पाटील साहेब मंत्री जलसंपदा महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते दोन वेळा नागरी सत्कार चित्रकला व सांस्कृतिक कलेची आवड, विद्यालये व सामाजीक संस्था मार्फत आयोजीत केलेल्या चित्रकला, रांगोळी, सांस्कृतिक व इतर स्पर्धांच्या परीक्षकाचे काम १५ ऑगस्ट २०२१ च्या प्रति महात्मा फुलेवाडा, पुणे येथील सत्यशोधक पुरस्कार प्रदान समारंभाचे अध्यक्षपद सद्या विभागीय वाहतूक अधिक्षक पदी पुणे येथे कार्यरत
समाजातील वैचारीक मागासलेपण जवळून अनुभवल्याने “लालपरीचे आनंदयात्री” या कथा संग्रहात आलेल्या कथातुन सामाजाची व्यथा व वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला असून अंधः श्रध्देला खतपाणी न घातला समाजाने विज्ञानवादी व मानवतावादी मार्गाने सुंदर आयुष्य जगण्याचा आशावाद फलदायी होण्यासाठी केलेला एक प्रामाणिक प्रयत्न…….
Reviews
There are no reviews yet.