Description
पालित्रिपिटकातील सुत्तपिटकाच्या खुद्दक निकायामधील दहावा ग्रंथ ‘जातक’ हा आहे. या जातकामध्ये असलेल्या ५४७ जातककथा मूलत: बुद्धविचाराची, जीवनमार्गाची शिकवण देणाऱ्या नीतीकथा आहेत. बोधिसत्त्वांनी सत्शील पालनासाठी पराकाष्ठा करण्यासाठी दहा पारमितांमध्ये परिपूर्ण होऊन बुद्धत्व प्राप्त केले; आणि अशी परिपूर्तता कोणताही सदाचारी माणूस बुद्धविचारांनी जीवनयापन करून मिळवू शकतो, ऐसे दाखविताना प्रज्ञा, शील, करुणेचे संस्कार करण्यासाठी या जातककथांचा उपयोग प्राचीन काळी बौद्ध श्रमणांनी गृहस्थी उपासकांनी केला आहे.
लेखन कलेचा फार प्रसार झाला नव्हता त्याकाळी शिल्पकला, चित्रकलांमध्ये जातककथांची गुंफण करून धम्मप्रचार व प्रसार करण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर सम्राट अशोकाच्या काळात आणि त्या नंतरही झाले आहे. स्तुपाच्या तोरणांवरील शिल्पपटातून लेणींच्या शिल्प आणि भित्ती चित्रांमधून अनेक पिढ्यांना या जातक कथांनी नीतिधम्म शिकविला आहे.
आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी मुळातल्या ५४७ जातक कथांपैकी काही कथांचे हे संकलन मराठी भाषकांसाठी ३ भागात रचून प्रकाशित केले होते. ते नव्या पिढीतील बुद्धानुयायांना धम्ममार्ग प्रशस्त करण्यास उपयोगी ठरेल अशी अपेक्षा आहे.

Reviews
There are no reviews yet.