Description
विसाव्या शतकातली एक श्रेष्ठ भौतिकशास्त्रज्ञ लीझ माइटनर हीनं किरणोत्सर्ग आणि अणुगर्भ विज्ञान यांत मूलभूत संशोधन केलं. माइटनरला तिच्या कामानं आणि संशोधनानं इतकं झपाटून टाकलं होतं, की अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजाही तिच्यासाठी कठीण व्हाव्यात अशी परिस्थिती तिनं स्वीकारली. पंधरा वेळा नामांकन होऊनही केवळ ती स्त्री असल्याकारणानं तिला नोबेल पुरस्कार मिळाला नाही. पुरुषांची टीका, समाजाकडून होणारी पदोपदी अवहेलना आणि अपमान हे सगळं सगळं सहन करत तिला पुढे जावं लागलं. आईन्स्टाईन तर लीझला कौतुकानं ‘अवर मादाम क्यूरी’ असं म्हणत असे.
“माझं काम हीच माझी ओळख आणि तेच माझं चरित्र” असं लीझ माइटनर म्हणत असे. तिच्या समाधीस्थळावरचं तिच्यावर प्रेम करणारा तिचा भाचा ऑटो फ्रिश यानं कोरलेलं वाक्य तिची ओळख करून डेट सांगतं : लीझ माइटनर : अशी भौतिकशास्त्रज्ञ जिनं आपली माणुसकी कधीही सोडली नाही !
Reviews
There are no reviews yet.