Description
महामानवाचं जीवन सर्वांगानी आणि सर्वार्थांनी सुसंपन्न आणि समृद्ध असतं अशा महापुरुषाचं कौटुंबिक जीवन तितकंच वैभवशाली आणि वर्धिष्णु असतं असं मात्र नि:संशय म्हणता येणार नाही. बहुआयामी जीवन फारच थोड्या लोकांच्या वाट्याला येत असतं. पोरबंदर येथे १८६९ मध्ये जन्मलेले महात्मा गांधी अशा थोडक्यातले एक.
मोठ्या माणसाचा परिचय व्हावा अशी पुष्कळांची अपेक्षा असते. अशी ओळख समग्रपणे व्हावी, अशीही जिज्ञासा काहींच्या ठिकाणी असते. प्रसिद्ध व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनात डोकावून बघण्याची इच्छा अशाच उत्कटतेतून निर्माण होते. सामान्य माणसाची वंशावळ समजून घेण्यात लोकांना रस नसतो महामानवाचा जीवनग्रंथ तसा उघड़ा असतो; पण त्यात सगळेच शेंडे बुडखे बघायला मिळतील ऐसे नाही. महात्मा गांधी याही बाबतीत अपवाद आहेत.
गांधी कुटुंबाचा वंशवृक्ष खालच्या बुंध्यापासून वरच्या शेंड्यापर्यंत पाहायला मिळाला, तर तो हवाहवासा वाटणाराच असतो आणि तो तसा बघण्यात गंमत तर असतेच, आणि धन्यताही असते.

Reviews
There are no reviews yet.