Description
आद्यगुरू कौटिल्यांनी त्यांच्या ‘अर्थशास्त्र’ ग्रंथात राज्यशासनाच्या सर्व अंगांविषयी माहिती दिली आहे. त्यांनी ‘चाणक्य’ या उपनावाने राजा व शासनाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विकसवलेली राजनीती सूत्रे इतकी समर्थ होती की ती प्रत्यक्षात वापरून मिळालेले यश शतवर्षांहून अधिक टिकले. आर्य चाणक्यांची ही विचारप्रणाली जगात अद्वितीय ठरली आहे.
अमेरिका अथवा जपान येथे वापरांत येणाऱ्या व्यवस्थापनपद्धती त्यांच्या विशिष्ठ संस्कृतीला अनुरूप तयार झाल्या आहेत. ह्या पद्धती प्रत्यक्षांत उतरवायचे प्रयत्न प्रामाणिक असूनसुद्धा त्या भारतांतील उद्योगजगतात नीट रूजत नाहीत व परिणामकारक ठरत नाहीत असे आढळते. भारतीय उद्योगजगतांत व राज्यशासनांत आपल्या संस्कृतीस अनुरूप अशी व्यवस्थापनपद्धती राबविल्यास ती अधिक यशस्वी ठरावी. सुदैवाने अशी संपूर्ण विचारधारा राजनीतीवरील चाणक्यसूत्रांत सापडते. या संकल्पनांचा उपयोग भारतांतील व भारताबाहेरील भारतीय उद्योजक, व्यवस्थापक व शासक या सर्वांना व्हावा हा प्रस्तुत लेखनाचा मुख्य उद्देश आहे.
Reviews
There are no reviews yet.