आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास
₹350.00 ₹320.00
1 in stock
पुस्तकाचे नाव |
आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास |
लेखक |
ऋग्वेदी (वामन मंगेश दुभाषी) |
ISBN |
-- |
भाषा |
मराठी |
पुस्तक बांधणी |
पुठ्ठा बांधणी |
पानांची संख्या |
३९४ |
आकार |
५.५ * ८.५ इंच |
वजन |
४२१ ग्रॅम |
Description
या ग्रंथात चैत्रापासून फाल्गुनापर्यंतच्या सणांची माहिती सविस्तर दिली आहे, ‘सण’ हा शब्द संस्कृत ‘क्षण’ या शब्दातून निघाला आहे. अशा शब्दास तद्भव हा पारिभाषिक शब्द वापरतात. क्षण – छन – सण अशी याची व्युत्पत्ती आहे. हेमचंद्राच्या प्राकृत व्याकरणात छण म्हणजे उत्सव असा अर्थ सांगितला आहे. श्राद्ध हा पितरांचा उत्सव असतो. त्यास क्षण हा शब्द अजूनही रूढ़ आहे. श्राद्धीय ब्राह्मणांस ‘ क्षण: कर्तव्य:’ असे यजमान श्राद्धकाली म्हणतो. मेघदूत दशकुमाररचित आणि श्रीमद्भागवत यांमध्ये क्षण शब्द सण किंवा उत्सव या अर्थी वापरला आहे. सर्वदर्शन संग्रहात अमावस्या व पौर्णिमा या तिथींचा वाचक क्षण हा शब्द सांगितला आहे. दर्श व पूर्णमास या दिवशी इष्टी असते. अमावस्येला दर्शश्राद्ध असते. बहुतेक पौर्णिमांच्या दिवशी कोणत्यातरी एखाद्या देवतेचा व देवाचा सण असतो. उदा. चैत्र – पौर्णिमा, हनुमंत जयंती, ज्येष्ठ पौर्णिमा – वटसावित्री, श्रावण पौर्णिमा नारळी, आश्विन पौर्णिमा – कोजागरी, कार्तिक पौर्णिमा – त्रिपुरी, मार्गशीर्ष पौर्णिमा दत्तजयंती, फाल्गुन पौर्णिमा – होळी. महाराष्ट्रातील सण अधिक संख्येने या ग्रंथात दिले आहेत. इतर प्रांतांचे कमी दिले आहेत . कोणते सण कोणत्या भारतीय प्रांतामध्ये कशाप्रकारे साजरे होतात हे सांगितले आहे. पंजाबपासून बंगालपर्यंत आणि हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या सणांचे विवरण केले आहे. त्या ठिकाणी सणांच्या कर्मकांडाचे स्वरूप, उत्पत्ती, तत्संबद्ध असलेली पुराणकथा व निरानीराळे आचार सांगितले आहेत. अनेक ठिकाणी महत्त्वाचे सण किंवा उत्सव यांचे नैतिक व सामाजिक हेतु व बोध सविस्तर वर्णिले आहेत. शास्त्रोक्त विधी कसा व परंपराप्राप्त रूढ़ी कशी, याचाही खुलासा केला आहे. रामनवमीच्या संदर्भात रामचरित्र, त्याचा ऐतिहासिक अर्थ, क्षत्रियांची कामगिरी, सामाजिक नीतिमत्ता, रामराज्य, पतिपत्नीचे प्रेम, राक्षस व वानर कोण, रामायणाचा काल, अलौकिक चमत्कारांचा उलगडा, रामचरित्रापासून बोध इ. मुद्यांचे विस्ताराने स्पष्टीकरण केले आहे. याच पद्धतीचे कमीजास्त प्रमाणात विवरण या ग्रंथात ठिकठिकाणी ग्रंथकारांनी केले आहे. अनेक प्रकारणांच्या शेवटी त्या त्या देवतांच्या स्वरचित आरत्या दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.