हू किल्ड करकरे

405.00

1 in stock

पुस्तकाचे नाव हू किल्ड करकरे
लेखक एस.  एम. मुश्रीफ
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३४४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३८६ ग्रॅम

Description

देशांतर्गत अथवा बाहेरील शक्तीमुळे होणारा राजकीय हिंसाचार आणि दहशतवाद या दोन्ही गोष्टींना भारतात फार जुना इतिहास आहे. भारतीय मुसलमान आतंकवादी आहेत ही भावना १९९०च्या दशकात जहाल हिंदुवादी शक्तींच्या उदयानंतर आकार घेऊ लागली आणि भारतीय जनता पार्टीला केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर तर तिला घोषवाक्याचे स्वरूप आले होते. स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणवून घेणारी माध्यमे सुरक्षा संस्थांची स्टेनोग्राफर म्हणून काम करू लागल्यानंतर तर दहशतवादी मुस्लीम ही एक सर्वमान्य गोष्ट बनली. इतकी, की अनेक मुसलमानांचाही या खोट्या प्रचारावर विश्वास बसू लागला.

पोलीस खात्यात ज्यांनी उल्लेखनीय सेवा केली आणि तेलगी प्रकरणासारखे घोटाळे उघडकीस आणले, त्या माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी मुश्रीफ यांनी आपला सामाजिक क्षेत्रातील आणि पोलीस खात्यातील प्रदीर्घ अनुभव यांच्या आधारे व प्रसिद्ध झालेल्या माहितीचा वापर करून या खोट्या प्रचाराचा मागोवा घेतला आहे. त्यातून काही अत्यंत धक्कादायक सत्ये उघडकीस आली आहेत. त्यांनी केलेले विवेचन, जे अशा प्रकारचे पहिलेच आहे, तथाकथित मुस्लीम दहशतवादामागील खऱ्या शक्तीचा रहस्यभेद करून त्यांचे सत्य स्वरूप उघड करत आहे. जिगरबाज आणि सत्याचा पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी आपला पर्दाफाश केल्याबद्दल त्यांचा पद्धतशीरपणे खून करून बदला घेणाऱ्या याच खऱ्या दहशतवादी शक्ती आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हू किल्ड करकरे”

Your email address will not be published. Required fields are marked *