सिंह सेनापती

₹360.00

1 in stock

पुस्तकाचे नाव सिंह सेनापती
लेखक राहुल सांकृत्यायन
ISBN 978-93-93817-02-0
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३०९
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३४० ग्रॅम

Description

वैशाली हे भारतातील एक समृद्ध गणराज्य होते. ‘सिंह’ हा वैशालीचा बुद्धकाळातील सेनापती होता. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिलेली सेनापतीची ही कथा विटांवर कोरून जतन केलेली आहे. ही केवळ एका पराक्रमी सेनापतीची शौर्यगाथा नाही, तर ती त्या भारताची कथा आहे, जेथे समृद्ध शेती, फळबागा, पशुपालन आणि व्यापार होता, गणराज्ये होती, त्या गणराज्यांमध्ये लोकशाही होती, शौर्याला बुद्धीची साथ होती, श्रमाला प्रतिष्ठा आणि मूल्य होते. महान वैशाली गणाचा सेनापती सिंह हा तक्षशिलेत शिक्षण घेणारा प्रतिभाशाली विद्यार्थी होता तसाच अद्वितीय योद्धा आणि मानवतावादी नेताही होता. युद्धात शत्रूच्या जखमी सैन्यावर सुद्धा औषधोपचार करणारा, दासांना मुक्त करणारा, लोकशाही मूल्य जोपासणारा सेनापती सिंह अखेरीस तथागत गौतम बुद्धांच्या मार्गाने जातो, हा केवळ सेनापती सिंहचा प्रवास नसून तो त्याकाळातील संपूर्ण मानवी संस्कृतीचा आरसा आहे.

या कथेतील स्त्री केवळ पुरुषप्रधान सौंदर्याची प्रतिमा नाही तर रणांगणात खांद्याला खांदा लाऊन लढणारी, निर्भय, शूर आणि पराक्रमाचा इतिहास घडविणारी आहे. रोहिणी, भामा, क्षेमा यांच्यासारख्या कर्तबगार स्त्रिया स्त्रीत्वाची नवी व्याख्या सांगतात. कोमल, नाजुक, अबला यांनी बंदिस्त केलेली स्त्रीत्वाची चौकट मोडून बुद्धिमत्ता, कणखरपणा, शौर्य आणि समता सांगणारी वेगळी सौंदर्यदृष्टी वाचकांसमोर उभी करतात. लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता, स्त्रीवाद यांसारख्या आधुनिक मूल्यांनी समृद्ध असलेला हा इतिहास आपल्याच मातीत रुजलेला होता याची गोड आठवण ‘सिंह सेनापती’ ही कादंबरी करून देते. महापंडित राहुल सांकृत्यायन सांगतात, ही कादंबरी जगातील महान अविष्कारांपैकी एक आहे, यात शंका नाही.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सिंह सेनापती”

Your email address will not be published. Required fields are marked *