सर्वोदय-तीर्थ

160.00

1 in stock

पुस्तकाचे नाव सर्वोदय-तीर्थ
लेखक शांतिलाल भंडारी
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या २२४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

भगवान महावीर विचारधारेप्रमाणे वर्ण – वर्गविरहित व शीलमंडित असा संघटित मानवसमाज हे महन्मंगल सर्वोदय तीर्थ. अशा चारित्र्यसंपन्न मानवसमाजातील सौजन्य आणि सौहार्द्य अभिनंदनीय व वंदनीय म्हणून आत्मकल्याणातून विश्र्वकल्याणाचा मार्ग दाखवणारे सर्वोदय तीर्थ हे सन्मति = तीर्थ.

भगवान महावीरांचे विचारच इतके प्रगल्भ आणि प्रभावशाली आहेत की, ते प्रात:स्मरणीय असल्याने अमाप भक्तिभावाने व अतीव तळमळीने त्यांची असंख्य पारायणे होत राहतात.  यासाठी ‘सर्वोदय तीर्थ’ स्थापन करणारे तीर्थकार भगवान महावीर ‘सन्मति तीर्थ’ म्हणून गौरवले  गेलेले आहेत.  अशा सन्मति- तीर्था’ च्या संजीवक अमृतकलशाषी, अक्षय प्रबोधनाची, मौलिक विचारधनाची तेजस्वी पालखी अंगाखांद्यांवरून अव्याहत उभारीने वाहण्यात धन्यता मानणे; आणि त्या प्रतिबोधप्रमाणे जीवन साफ़ल्यासाठी सदैव जागरूक राहून आयुष्याची यशस्वी वाटचाल करणे.

‘भगवान महावीर’ यानंतर ‘महन्मंगल’, आणि आता त्यानंतर हे ‘सर्वोदय तीर्थ’ असा हां वैचारिक प्रवास आत्मकल्याणातून विश्वकल्याणाकडे नेणाऱ्या महामार्गावरचा. हा प्रवास सुखावह आणि हा  प्रयास हितावह ठरू शकतो; सहृदयतेच्या आणि सहकाराच्या पाथेयावर, एकमेका सद्भावाने साहाय्य करू या शिदौरीवर.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सर्वोदय-तीर्थ”

Your email address will not be published. Required fields are marked *