महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास

200.00

1 in stock

पुस्तकाचे नाव महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास
लेखक मा. शं. मोरे
ISBN 978-93-94925-48-9
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ८३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २६० ग्रॅम

Description

शोषणमूलक, भेदभावपूर्ण समाजव्यवस्थेस छेद देऊन, बहुजनांच्या हितासाठी – बहुजनांच्या सुखासाठी समाजमनास सुप्रज्ञ करणाऱ्या बुद्धतत्त्वज्ञानाचे अधिराज्य सबंध दीड हजार वर्षे या भारतभूवर कार्यरत राहिले. बहुजनांच्या ऊर्मीला, ऊर्जेला आणि ऊर्जस्वलतेला खडबडून जागे करून बुद्धविचाराने कला, साहित्य, संस्कृतीचे कालातीत सर्जन केले, संवर्धन केले. भारतभूचा असा प्रदीर्घ इतिहास बुद्धलेणीचे स्थापत्य, शिल्प, भित्तीचित्रे, स्तंभलेख, प्रस्तरलेख, अनेक खंडातील पाली वाङ्मय, जनजीवनातील  समता संकल्प आणि संकल्पना तसेच नव्या संत – पंथांच्या शिकवणुकीवरील प्रभाव या स्वरुपात बुद्ध विचाराने व्यापलेला आहे.

तथापि मराठी आणि इतर भाषिक साहित्यातही इतकी इतिहास साधने उपलब्ध असून सुद्धा या इतिहासाची नोंद मात्र अभावानेच होते.  सरकारी गॅझेटीअर्स, विद्यापीठीय संशोधन आणि पुरातात्त्विक प्रकल्प यात बुद्धधम्म आणि त्या विचारास अनुसरणारे समाज गट या बाबतचे संशोधन नगण्यच आहे. नव्या बहुजन – उन्मेषाला आपला पूर्वसूर मिळवून देण्यासाठी असे संशोधन गरजेचे आहे. ”महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास” त्या वाटेवरचे एक पाऊल ठरावे !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास”

Your email address will not be published. Required fields are marked *