Description
• हल्लीच्या काळी महाराष्ट्रातील तरुणांत श्रीधरपंतांच्या तोडीचा तरुण सापडणे अत्यंत कठीण आहे. तरुण महाराष्ट्र परिषदेत जिभल्या पाजळणारे तरुण कोणीकडे आणि आमचे श्रीधरपंत कोणीकडे? ठरावांची रेलचेल करून गिरीकंदरी लपून बसणाऱ्या तरुणांतील भेकड तरुण ते नव्हते. त्यांचा निश्चय, जोम व कर्तबगारी ही सारी अवर्णनीय होती. ते जगले असते तर महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण्याचे महान कार्य त्यांनी तडीस नेले असते. याचमुळे श्रीधरपंतांच्या मरणासंबंधी मला थोडा राग येतो. सामाजिक सुधारणेच्या अंगीकृत कार्यात आपणास केवडे स्थित्यंतर घडवून आणता येईल याची त्यांना यथार्थ कल्पना असावयास पाहिजे होती व त्या कार्यासाठी तरी निदान त्यांनी जगावयास पाहिजे होते. नुसत्या जगण्यात हशील नाही हे तत्त्व मलाही मान्य आहे. परंतु सफल जीवन स्वार्थासाठी नाही, तरी परार्थासाठी साठवलेच पाहिजे. श्रीधरपंतांना याचा विसर पडला.
Reviews
There are no reviews yet.