Description
त्यांनी या ग्रंथाचे लेखन करताना मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी आणि पाली या भाषांतील विविध ग्रंथांचेही संदर्भ घेतले आहेत. त्यांनी आपल्या या ग्रंथात मराठी साहित्यात प्रतिबिंबित झालेले बुद्धांचे चरित्र आणि तत्त्वज्ञान तर सुलभ व वाचनीय स्वरूपात मांडले आहेच. पण त्यांच्या या ग्रंथाची आणखी दोन वैशिष्ट्ये मी येथे आवर्जून नोंदवू इच्छितो. बुद्धांचे समतेचे विचार मान्य नसलेल्या वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्याबर काही हेत्यारोप केले आहेत. त्यांच्यापैकी काही आरोपांचे डॉ गायकवाड यांनी समर्थपणे खंडन केले आहे. मावी काळात त्यांच्या हातून या विषयावर एखादा सर्वांगीण ग्रंथ मराठी साहित्याला अलंकृत करो, अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. त्यांच्य या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी इतर भाषांतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या बुद्धविषयक साहित्याची समीक्षा केली आहे. हेही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. असे मला वाटते.
बुद्धांना समजून घेण्यासाठी अनेक दृष्टींनी उपयुक्त ठरणारा असा एक ग्रंथ मराठी वाचकांना दिल्याबद्दल डॉ. गायकवाड धन्यवादासही आणि अभिनंदनासही पात्र आहेत. यापुढेही बयांच्या हातून अशाच उत्तमोत्तम ग्रंथांचे लेखन होवो, अशी सदिच्छा या प्रसंगी मी व्यक्त करतो.

Reviews
There are no reviews yet.