Description
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. त्यामागे त्यांचे वडील शहाजीराजे व आई जिजामाता यांचीच प्रेरणा होती. या दोघांनाही त्यांच्या वडिलांकडून ही प्रेरणा मिळाली होती. दोघांच्याही घराण्यात दोन पिढ्यांपासून त्या दिशेने वाटचाल सुरु होती.
शिवाजीमहाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता. सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य पाहिजे होते. त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून महाराजांनी राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील गुलामगिरी मोडून काढली.
Reviews
There are no reviews yet.