Description
सामाजिक जागृतीच्या ध्येयात आंबेडकरांनी बजावलेल्या भूमिकेचा खूप अभ्यास झाला. १९४६ ते १९५० या काळात भारतीय राज्यघटना लेखनात डॉ. आंबेडकरांनी घेतलेल्या सहभागामुळेही बऱ्याच लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं. अर्थात भारतीय राज्यघटना केवळ १९४६ ते १९५० एवढ्याच काळात लिहिली गेली नसून जवळजवळ चार दशकं तिच्यावर काम चाललं होतं असा युक्तिवाद ‘ दूरदर्शी आंबेडकर’ या पुस्तकात अनुराग भास्कर यांनी केला आहे. १९१९ सालापासून भारतीय राज्यघटना निर्मितीचं काम चालू होतं आणि त्या लेखनाच्या सर्व टप्प्यात गुंतलेले एकमेव माणूस डॉ. आंबेडकर हेच होते. त्यांचं योगदान आणि भूमिका यांचा ठसा या सर्व टप्प्यांवर पडलेला आढळून येतो.
डॉ. आंबेडकर १९१९ साली सार्वजनिक जीवनात आले. तिथपासून ते प्रत्यक्ष राज्यघटना लेखन आणि त्यानंतरही त्यांचा राज्यघटनात्मक विचारमंथनावर भरपूर प्रभाव पड़ला. त्या प्रभावावर या पुस्तकाचं लक्ष केंद्रित झालं आहे. राज्यघटना निर्मितीतील वेगवेगळे क्षण जसजसे प्रत्यक्ष घडले तसतसा त्या सर्वांचा समावेश या पुस्तकात केला आहे आणि त्या त्या क्षणी डॉ. आंबेडकरांची भूमिका काय होती तेही या पुस्तकात विशद केलं आहे.
डॉ. आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे जनक असं का म्हटलं जातं ते या वैचारिक आणि राज्यघटनात्मक इतिहासावरील महत्त्वपूर्ण पुस्तकांन सार्थपणे दाखवून दिलं आहे.

Reviews
There are no reviews yet.