Description
मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे साक्षेपी अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांनी साहित्य अकादेमीसाठी संपादित केलेला प्रस्तुत श्री नामदेव गाथा (निवडक अभंग) हा ग्रंथ म्हणजे वारकरी पंथातील एक ज्येष्ठ संत श्री नामदेव महाराज यांच्या चरित्राचा, कार्याचा आणि अभंगवाणीचा सुविहित आलेखच होय. श्री नामदेव महाराजांनी श्री विठ्ठलाची भक्ती सर्वदूर ख्यात केली आणि ह्या भक्तीच्याच सूत्रात महाराष्ट्रातील वारकरी पंथाचे सुसंघटन केले. उत्तरेकडे पंजाबादी प्रदेशात नामदेवांनी केलेले कार्य तर केवळ लोकोत्तर आहे. त्यामुळेच त्यांच्या रचना शीख धर्मीयांच्या ‘श्री गुरू ग्रंथसाहिबा’ तही समाविष्ट झालेल्या आहेत. प्रस्तुत ग्रंथाला शेणोलीकरांनी सुदीर्घ विवेचक प्रस्तावना जोडलेली आहे. प्रस्तावनेत त्यांनी नामदेवांचे चरित्र, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान यांचा चिकित्सक परामर्श घेतलेला असून त्या संदर्भात आपली निर्णायक मते नोंदविलेली आहेत. प्रस्तावनेच्या अखेरीस नामदेवांची भक्तिकल्पना स्पष्ट करून नामदेवांच्या अभंगवाणीतील काव्यगुण विशद केले आहेत.
या संपादनात शेणोलीकरांनी नामदेवांच्या अभंगगाथेचे मंगलचरणाचे अभंग, पौराणिक आख्याने, ज्ञानेश्वर चरित्र, संत चरित्रे, आत्मनिवेदनपर अभंग, भक्तिभाव सांगणारे अभंग, नीतिबोध करणारे अभंग इत्यादी एकूण ११ विभागांत संकलन केले आहे. या ग्रंथास पाच महत्त्वपूर्ण परिशिष्टेही जोडलेली आहेत. हे संपादन संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कर्तृत्वाचे यथार्थ दर्शन घडविणारे असेच आहे.
Reviews
There are no reviews yet.