Description
देवी या रोगातून संपूर्ण जगाला रोगमुक्त करण्यात एडवर्ड जेन्नर या ब्रिटिश शास्त्रज्ञाचं फार मोठं योगदान आहे. देवीच्या या रोगानं जगभर लाखो/करोडो लोकांचा बळी घेऊन धुमाकूळ घातला होता. 1798 साली देवीची लस जेन्नरनं शोधल्यामुळे 1980 साली देवी रोग संपूर्ण जगातून समूळ नाहीसा झाला. संपूर्ण जगाला त्यानं कायमचं ऋणात ठेवलं आहे. मानवजातीच्या इतिहासात एडवर्ड जेन्नरच्या शोधामुळे जितके प्राण वाचले, तितके इतर कुठल्याही संशोधनानं वाचले नसतील.
”देवी रोग कळवा शंभर रूपये मिळवा” अशी 1970 च्या दशकात सुरुवातीला भींतिभिंतींवर असलेलं आरोग्य विभागाचं आव्हान हळूहळू ‘देवीचा रोग कळवा, एक लाख रूपये मिळवा’ करत रकमेची वाढ होत गेलं आणि अखेर जागतिक आरोग्य संघटनेनं 1979 साली देवीचा रोग संपूर्णतः नष्ट झाल्याचं घोषित केलं. एडवर्ड जेन्नरच्या सन्मानार्थ चंद्रावरच्या एका मोठ्या खड्ड्याला जेन्नरचं नाव देऊन समस्त मानवजातीनं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
Reviews
There are no reviews yet.