Description
परवा, १८ जुलै, १९६९ हा वाड्मयाच्या कारखान्यातील धडाडता बॉयलर एका साध्या काथ्याच्या चारपायीवर विझला. विझताना जवळ कोणी नाही. पलीकडे राहणाऱ्या मिसेस राव आपल्या आणि त्यांनी या बेवारशी माणसासारख्या मरण पावलेल्या लेखकावर आपल्या घरातली चादर आणून घातली. नाकातोंडात कापसाचे बोळे घातले. खोलीत, शेजारपाजारच्या दोनचार बायका, भिंतीवर टांगलेली त्या पोराची एक तसबीर आणि कोपऱ्यात गंभीर चेहऱ्याने त्या प्रेताकडे पाहत विचार करणाला मॅक्झिम गॉर्कीचा छोटासा पुतळा. बस्स ! एवढेच. या देशात मरण स्वस्त आहे हेच खरे.

Reviews
There are no reviews yet.