Description
सध्याच्या पिढीला खडबडून जागं करणाऱ्या सेल्फ -हेल्प गाईडमध्ये मार्क मॅनसन हा स्टार ब्लॉगर आपल्याला आनंदी होण्याचा आणि खंबीर आयुष्य जगण्याचा मूलमंत्र सांगतो. तो मूलमंत्र आहे : प्रतिकूल परिस्थितीला नेटाने तोंड देता येण आणि सदासर्वकाळ ‘सकारात्मक ‘ राहण्याचा प्रयत्न सोडणं.
मार्क मॅनसन ब्लॉग गेल्या काही वर्षांमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्या ब्लॉगमध्ये त्याने आपल्या स्वतःबद्दल आणि आपल्या आजुबाजुंच्या जगाबद्दल ज्या अवास्तव अपेक्षा असतात, त्या खरंच किती अवास्तव असतात हे त्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे हेच नुसखे आणि तंत्र आता त्याने पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणली आहेत.
मनुष्य आहे तर तो चुका करणारच आणि त्याच्यात उणिवा असणारच या पायावरच मॅनसचा पूर्ण युक्तिवाद उभा आहे. तो म्हणतो, ”सगळेच खास कसे असणार? कोणी एक जिंकत असेल, तर हरणाराही कोणीतरी असेलच ना? मला माहितीये, कि हा विचार तुम्हाला आवडलेला नाही आणि त्यात तुमची चूकही नाही. ”मॅनसन आपल्याला आपल्या मर्यादा जाणून घ्यायचा आणि त्या मान्य करण्याचा सल्ला देतो. त्यानेच तुमचं भलं होऊ शकेल असं तो म्हणतो. आपल्याला एकदा का आपल्या भीती, उणिवा,दोष आणि अनिश्चितता यांना पार करून पुढे जात आलं, आपण त्यांच्यापासून पळ काढण्याचा किंवा त्यांना टाळण्याचा प्रयत्न थांबवला आणि आपण आपल्या आयुष्यातील कटू सत्यांना जिगरबाजपणे सामोरे जायला शिकलो, कि आपल्यात आपोआपच आयुष्य जगण्याचं बळ आणि आत्मविश्वास येतो.
आपल्याला एकच आयुष्य मिळालं आहे, त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टींनी फरक पडतो त्या गोष्टी कमीच ठेवायला शिकलं पाहिजे. आता त्या गोष्टी कोणत्या, याची निवड जाणीवपूर्वक आणि नीट विचार करून झाली पाहिजे. मॅनसनच्या या जरा- इथे- समोर- बस- आणि- माझ्याकडे- बघ- मला- तुझ्याशी- बोलायचं पद्धतीच्या लिखाणात विस्मित करणाऱ्या अनेक घटना आहेत, अरे! हे काय! असं म्हणायला लावणाऱ्या गोष्टी आहेत. त्याचं लिखाण कोणीतरी थोबाडावर थंड पाण्याचा हबकरा मारावा आणि खडबडून जग करावं असं वाटतं, पण ते तुम्हाला आयुष्य आधीकसमाधानाने जगायचंही बळ देतं.
Reviews
There are no reviews yet.