Description
ज्योतिषशास्त्राचे किंवा ज्योतिष सांगणाऱ्याचे सद्यस्थितीत देशभरात जरी स्तोम माजलेले दिसत असेल तरी अनेक लोकांच्या मनात ज्योतिष-फलज्योतिषाबद्दल असंख्य प्रश्न आहेत. देशभरात लोकांमध्ये आपले नशीब जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. खूपच कमी लोक असतील ज्यांनी आपल्या मुलाची/मुलीची कुंडली बनवली नाही.
- हे भविष्य सांगणारे ज्योतिषी कशाचा आधार घेवून भविष्य सांगतात ? कुंडली बनवतात ?
- ज्योतिषशास्त्र नेमकं कोणत्या सिद्धांतांवर चालतं ?
- हस्तसामुद्रिक, मुद्रासामुद्रिक, अंकसामुद्रिक म्हणजे काय ?
- नशीब-ज्योतिष खरं असतं की खोटं ?
- कर्मविपाक सिद्धांत म्हणजे काय ?
- नशीब-ज्योतिषावर कितपत विश्वास ठेवला पाहिजे ?
- आपले भुत-भविष्य-वर्तमान हे आधीच ठरलेले असतात का ?
- ब्रह्मांडातील ग्रह- ताऱ्यांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो का ? जर होतो तर कसा ?
- कुंडली खरी असते का ?
- देशभरातील ज्योतिषांना प्रा. श्याम मानवांनी कोणती आव्हाने दिली आहेत.
- ज्योतिषकथनाचे जे अनेक प्रकार आहेत ते प्रकार कोणते ?
- ज्योतिष हे विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरते का ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि गेल्या 40 वर्षात अंधश्रद्धेविरुद्ध लढताना प्रा. श्याम मानवांचा अनेक लहान – मोठ्या ज्योतिषांसोबत प्रत्यक्ष संबंध आला त्याबद्दलचे विविध अनुभव ह्या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती म्हणजे हे पुस्तक. ज्योतिषशास्त्राविषयी तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक शंकेचे समाधान म्हणजे हे पुस्तक…

Reviews
There are no reviews yet.