शोध संत रविदासांचा

500.00

1 in stock

पुस्तकाचे नाव शोध संत रविदासांचा
लेखक रवींद्र श्रावस्ती
ISBN 978-93-82451-91-4
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ४९६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ७२० ग्रॅम

Description

समाज व्यवस्थेतील जातिभेदाचे दाहक चटके सोसूनही मानवतेचे महन्मंगल स्वप्न पाहणारे दार्शनिक म्हणजे संत रविदास । जिथे उच्च-नीचता नाही, दुःखाचा लवलेशही नाही, बेचैनी-चिंता-भीती अशा भावनांचा मागमूस नाही, अशा ‘बेगमपूर’ म्हणजेच दुःखमुक्त शहराचे स्वप्न स्वतः पाहणारे आणि इतरांच्या मनात रुजविणारे ते द्रष्टे संत ! कधी तर्ककठोर बंडखोरी करणारे, तर कधी मानवी अस्तित्वातील सुकोमलता, सौंदर्य आणि सामर्थ्य नजाकतीने उकलून सांगणारे. बुद्ध-सिद्ध-नाथांच्या करुणामय परंपरेशी नाते सांगत आपल्या मूळ विचार परंपरेपर्यंत पोहोचणारे. ‘जो हम सहरी सो मीत हमारा’ असे म्हणत आपल्यातील विवेकी मनुष्यत्वाला साद घालणारे. १६व्या शतकापासून आजपर्यंत भारतीय समाजमनावर प्रभाव गाजविणारे. अशा अनोख्या संत रविदासांची भेट डॉ. रवींद्र श्रावस्ती संशोधनपूर्वक प्रस्तुत ग्रंथात घडवीत आहेत. संत रविदासांचे हे अनोखे जीवितकार्य समजून घेणे, हा स्वतःला समृद्ध करण्याचा एक आनंदसोहळा  आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शोध संत रविदासांचा”

Your email address will not be published. Required fields are marked *