डिप्रेशन

225.00

Out of stock

पुस्तकाचे नाव डिप्रेशन
लेखक अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २४२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २३० ग्रॅम

Description

आताच्या काळाची गरज आणि औचित्य ओळखून लेखक द्वयींनी सखोल अभ्यासानं आणि त्या विषयातल्या आकलनानं ‘नैराश्य’ हा विषय त्याच्या इतिहासापासून ते ग्लोबलायझेशनपर्यंत समजावून सांगितला आहे. या पुस्तकातलं प्रत्येक प्रकरण सखोल तरीही सुबक आहे. सामान्य वाचकाला आणि सगळ्यांनाच हे पुस्तक आवडेल अशी मला खात्री आहे. अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी हा अवघड विषय सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणून मांडला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
डॉ. आनंद नाडकर्णी, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ,
उत्कृष्ट वक्ता, प्रशिक्षक, नाटककार आणि लेखक, IPH संस्थेचे संस्थापक.

पुन्हा एकदा अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी क्लिष्ट, नाजूक आणि गंभीर विषय अत्यंत कौशल्यानं जिवंत करून दाखवला आहे. इंग्लिशमध्ये नैराश्य या विषयावर अनेक पुस्तकं आहेत. पण अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी अनेक दृष्टीकोनांतून या विषयावर प्रकाश टाकला आहे. त्या दृष्टीनं नैराश्यावरचं है पहिलंच पुस्तक असावं. यातली सगळी प्रकरणं रंजक आणि माहितीपूर्ण आहेत. नैराश्य या गोष्टीची ज्यांना काही ओळख नाही आणि जे या विषयात निपुण आहेत अश्या सगळ्यांना या पुस्तकातून नक्कीच काही घेण्यासारखं आहे.

डॉ. साधना नातू, असोसिएट प्रोफेसर, मानसोपचार तज्ज्ञ,
संशोधक आणि मानसशास्त्रविभाग प्रमुख मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड, पुणे.

आपल्या चौफेर चौकस वृत्तीने आणि बहुआयामी बुद्धीने ज्ञानशाखेच्या अनेक अंगांना सखोल माहितीची जोड देत ज्यांनी गेली दोन दशके अनेक ग्रंथ लिहून वाचकप्रियतेचे उच्चांक प्रस्थापित केले, अशा अच्युत गोडबोले यांच्या लेखणीने नैराश्य या महत्त्वाच्या विषयाचा डोंगर उपसून नवा ग्रंथराज सिद्ध केला आहे. नैराश्याचे ऐतिहासिक दाखले, त्याच्या शास्त्रीय मांडणीची वाटचाल, त्याची लक्षणे, त्याचा सामना करणाऱ्या अनेक रुग्णांच्या कहाण्या, त्याचा कला-संस्कृती- साहित्य-संगीत यावर पडलेला प्रभाव, नैराश्याचा सर्वागीण उपचार अशा अनेक पैलूंचा उलगडा करीत अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे या लेखक-द्वयींनी या विषयाचा फडशा पाडला असून या ज्ञानासाठी हपापलेल्या वाचकांसमोर माहितीचे ‘फोडिले भांडार’ आहे!

डॉ नंदू मुलमुले, एम. डी. डी.पी.एम, मानसोपचार तज्ज्ञ,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डिप्रेशन”

Your email address will not be published. Required fields are marked *