Description
शाहू छत्रपती जनतेशी समरस झालेले ऐसे वीर थोर पुरूष होते. त्यांना शेतकरी, मजूर म्हणवून घेण्यात धन्यता वाटते असे. राजे असूनही त्यांची राहणी फार साधी होती. गबाळा वाटण्याइतपत त्यांचा वेष साधा असे. याच वेषाने ते आपल्या प्रजेत मिसळत. कोणत्याही गहरी जाऊन त्याची चटनी भाकर खात. त्याच्या शेंबड्या पोरांना अंगाखांद्यावर खेळवीत. प्रसंगी जमिनीवर कांबळे टाकून तेथेच झोपत. त्याच्या सुखदु:खाची विचारपूस करीत. अडलेल्यांना सढळ हाताने मदत देत. असा हा खेडुतांचा राजा खड़खड़यात बसून फिरायचा, बरोबर महार, मांग वगैरे सेवेकरी अंगाला अंग लावून बसलेले. प्रसंगी सरदारदरकदारांवर त्यांच्या मोटारीतील फलाटवर उभे राहण्याची पाळी. पण आत मात्र सामान्य लोक. सामांन्यांशी इतका समरस झालेला राजा हाच आपले राजेपण विसरून प्रजेत वावरणारा हा राजा लोकनेता तसा होणार नाही? अधिकाराने असामान्य असूनही ते वर्त्तनाने सामान्य होते, आणि म्हणूनच सामान्यांचे, बहुजनसमाजाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले, हेच त्यांच्या यशाचे रहस्य होय.

Reviews
There are no reviews yet.