Description
प्रत्येक मराठा कुणब्याने स्वतःचे मन, मनगट, मणका, मान, मस्तक व मेंदू सशक्त करण्यावर भर दिलाच पाहिजे. वैज्ञानिक विचारसरणीचा अवलंब करून स्वतःचे, कुटुंबाचे व समाजाचे सर्वांगीण हित जोपासण्यावरच भर दिला पाहिजे. मातृत्व, भातृत्व, बंधुत्व, पितृत्व, दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व वृद्धिंगत करण्यावरच प्रत्येकाने लक्ष केंद्रित करावे. एका मराठा- कुणब्याने दुसऱ्या मराठा- कुणब्यासाठी आधार व्हावे. कुणब्यांनी आपल्याच कुणब्यांविरुद्ध आपली वाणी, नाणी व लेखणी वापरू नये. वाचन, चिंतन, मनन व कृतिशीलतेवर भर दिलाच पाहिजे. आपसातले सर्व प्रकारचे मतभेद गाडून टाकून एकसंघ, एकजीव कुणबी मराठा समाज निर्माण करायलाच पाहिजे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचा वापर सर्वच पोटजातींमध्ये बेटीव्यवहार सुरु करावा. समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणारे पूर्ण वेळ व प्रामाणिक कार्यकर्ते निर्माण करावे. अशा कार्यकर्त्यांची संपूर्ण जबाबदारी समाजाने उचलावी. समाज कार्यकर्त्यास मानाचे स्थान असावे. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने सकारात्मक विचारसरणी जोपासली व. समाजाचा सर्वांगीण उन्नतीसाठी प्रत्येकाच्या मनात जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द, प्रयत्न व सातत्य असावे. ”समाजाने मला काय दिले” यापेक्षा ‘समाजासाठी मी काय देऊ शकतो’ हीच भावना प्रत्येकाने मनात जोपासली पाहिजे.
Reviews
There are no reviews yet.