Description
या सत्यशोधकी ग्रंथामुळे उपेक्षित राहिलेल्या कर्तबगार व्यक्तींना न्याय दिल्यासारखे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यासारखे तर होणार आहेच, परंतु त्याचबरोबर समाजातील नव्या पिढीच्या लोकांना आपला खराखुरा इतिहास समजण्यासाठी मदतच होणार आहे.
भारतीय इतिहासाची निर्मिती केवळ विशिष्ट लोकांनी केलेली नसून समाजाच्या विविध स्तरातील लोकांनी प्रचंड त्याग करून, प्राणांतिक संघर्ष करून मानवमुक्ती लढ्यात जे योगदान दिलेले आहे, हे समकालीन संदर्भात समजणे राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीनेही अतिशय उपकारक ठरणारे आहे.
डॉ. शरद गायकवाड यांनी इतिहासाच्या पानांवर मातंग समाजातील कर्तबगार व्यक्तींचा ठळक ठसा उमटविण्याचे महत्कार्य या ग्रंथाच्या माध्यमातून केलेले आहे. हा ग्रंथ वाचक, कार्यकर्ते, संशोधक, आणि मातंगांसह एकूणच बहुजन समाजाला उपयुक्त आणि दिशादर्शक ठरणार आहे.

Reviews
There are no reviews yet.