राजर्षी शाहू छत्रपती : रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र

1,100.00

Out of stock

पुस्तकाचे नाव राजर्षी शाहू छत्रपती : रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र
लेखक इंद्रजीत वसंतराव सावंत, देविकाराणी शिवाजीराव पाटील
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या २८०
आकार ६ * ९ इंच
वजन १६३१ ग्रॅम

Description

“शाहूराजा नुसता मराठा नव्हता, ब्राह्मणेतरही नव्हता. तो नवयुगाताला सर्वांगपुरूष राष्ट्रपुरूष होता. तो परकीयांची नांगी ओळखून होता, ही गोष्ट ज्यांनी त्याच्याशी गुजगोष्टी केल्या, त्यांना तरी सांगणे नको. तो हाडाचा मराठा असल्याने जो गनिमी कावा त्याच्या हाडात भिनला होता, तो आता त्याच्या वर्तनात उघड चमकू लागला! हां कावा त्याने पत्करला नसता, तर महाराष्ट्राच्या जनतेला जागी करून तिच्या पायांवर उभी करण्याचे काम त्याच्या हातून झाले नसते. टिळक आणि जोतिबा फुले ह्या दोघांचेही हल्ले सामन्याचे होते. श्रीशाहू जरी आता पडद्याबाहेर पडला होता, तरी त्याने कधी कोणाला सामना दिला नाही. पण प्रत्येकाच्या बगलेतील हाडे त्यांना नकळत ह्या राष्ट्रसेवकाने हसत हसत  खिळखिळी करून टाकली ! इतकी की, भटशाहीप्रमाणेच पुढे पुढे नौकरशाहीलाही हे कोल्हापुरी कोडे विचार आणि कौतुकही करावयास भाग पाडू लागले. ह्या वर्णनावारून श्रीशाहू हा एखाद्या लेनिनच्या वळणावरचा क्रांतिकारक उत्पात होता, असे कोणी समजेल तर तेहि खरे नाही. तो महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा स्वाभाविक तरंग होता हेच जास्त खरे !”  

 

                                                                                                                 – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजर्षी शाहू छत्रपती : रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र”

Your email address will not be published. Required fields are marked *