चंद्र असा जिंकला

45.00

1 in stock

पुस्तकाचे नाव चंद्र असा जिंकला
लेखक रमेश के. सहस्त्रबुद्धे
ISBN 978-81-7492-120-6
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६० ग्रॅम

Description

कवींना काव्याची स्फूर्ती देणारा, तरुणतरुणींना आनंदित करणारा, नवविवाहितांना आनंदित करून त्यांच्या प्रेमचेष्टांना उत आणणारा, अगदी लहान मुलांनादेखील आपल्याकडे आकृष्ट करणारा, रात्रीच्या वेळी आपल्या शीतल व मंद प्रकाशाने अखिल जगताला न्हाऊ घालणारा चंद्र ज्याला माहीत नाही असा माणूस शोधून देखील सापडावयाचा नाही.

लहान मुलांना थोडेसे समाजू लागताच ती सर्वप्रथम आकर्षित होतात ती ह्या चंद्राकडेच! ”चांदोमामा चांदोमामा, भागलास कां, भागलास का…! हे गाणे सर्व लहान मुलांचे तोंडी नेहमीच घोळत असते. रात्रीच्या अंधारात आपल्या मोहकतेने जेथे तो मोठ्या माणसांना देखील भुरळ पाडतो तेथे लहानांची काय कथा ! फार काय, पण पुरुषादर्श प्रभु रामचंद्र, त्याने देखील लहानपणी चंद्राचा हट्ट धरला होता. अनेक नामांकित कवींच्या काव्याला चंद्रप्रकाशातच बहर आलेला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चंद्र असा जिंकला”

Your email address will not be published. Required fields are marked *