Description
महाराष्ट्र हा समृद्ध वारसा असलेले राज्य आहे. आपल्या या राज्याच्या जडणघडणीत विविध गावांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बहुतांश गावांचा इतिहास प्राचीन काळापासून सुरू होतो. प्रत्येक गावामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता आढळून येते. गाव म्हटले की, डोंगराच्या कुशीत किंवा नदीच्या काठावर वसलेलं टुमदार गाव अशी संकल्पना सर्वसामान्य लोकांच्या मनात उमटते. शहरात राहणाऱ्या लोकांना तर त्यांच्या मूळ गावाची ओढ नेहमीच असते. प्रत्येक गावाची एक वेगळीच ओळख असते. गावात असणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रा, चालीरिती, गावासंदर्भात असणाऱ्या आख्यायिका अशी अनेक कारणे त्या गावाला पंचक्रोशीत प्रसिद्ध करतात.
महाराष्ट्रात भटकंती करताना वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि रूढीचे जतन करणारी तसेच इतिहास जपणारी आणि घडवणारी अनेक गावे आढळून येतात. अशा गावांनी शेकडो वर्षे त्या प्रथा, परंपरा आणि रुढी जपल्या आहेत. अशाच वेगवेगळ्या गावांच्या कथा ह्या पुस्तकात दिल्या आहे.
जसे की,
- राष्ट्रगीताने आपल्या कामाची सुरुवात करणारे गाव
- नवस फेडण्यासाठी देवाला चपला अर्पण करणारे गाव
- मशिदित गणपती बसविणारे गाव
- रावणाची पूजा करणारे गाव

Reviews
There are no reviews yet.