Description
हजारो वर्षांपासून असंख्य साधू-संत, महंत, गृहस्थी माणसं नर्मदा परिक्रमा करतात. सुधाकर लोंढे हे सुद्धा गृहस्थी परिक्रमावासी. पण त्यांची परिक्रमा हि रंजक नसून वास्तववादी अशी आहे. त्यांच्या परिक्रमेत कुठेच अंधश्रद्धा चमत्काराला थारा नाही. सत्याचा शोध घेताना त्यांनी मांडलेल्या अनुभवांना एक वेगळीच रंगत येते आणि वाचकांची उत्सुकता देखील शिगेला पोहचते. त्यांचे अनुभव सत्याच्या जवळ जाणारे असून वाचकाला अंतर्मुख करणारे आहे.
सत्याचा शोध घेताना त्यांची लेखणी व्यसन, बुवाबाजी, धार्मिकतेचा बाजार यावर परखड भाष्य करते. तसेच आलेल्या अनुभवांची एक सुरेख गुंफण करत वाचकाला नर्मदा मैयाचे दर्शन घडवते.
‘साद नर्मदेची ‘ हे पुस्तक नवं परिक्रमावासीयांना मार्गदर्शन तर करतेच आणि वाचकाला एका अलौकिक जगाची सफरही घडवून आणते.
Reviews
There are no reviews yet.