Description
प्रा. डॉ. अशोक धोंडिबा बिडगर लिखित महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अभ्यास हा शोधग्रंथ वाचत असताना त्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबी निदर्शनास येतात. आपण जसजशी या ग्रंथाची पानं उलटत जातो तसतसा यातील संशोधनाचा परिघ चौफेरपणे विस्तारत जातो, हेच या शोधग्रंथाचे बलस्थान आहे. एकूणच या ग्रंथांतून धनगर समाजाचे अंतरंग आणि बाह्यांग विद्यापीठीय संशोधनाच्या पद्धती आणि शिस्तीनुसार प्रगट झाले आहेत. डॉ. अशोक बिडगर यांनी हा शोधग्रंथ साकारण्यासाठी मोठ्या परिश्रमाने संकलित केलेले संदर्भ, क्षेत्रीय अभ्यासाचा भाग म्हणून संबंधित स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन अनेकांच्या घेतलेल्या मुलाखतींच्या नोंदी पाहिल्या की थक्क व्हायला होतं. त्यांचं हे परिश्रम ग्रंथातील पानापानांवर जाणवल्याशिवाय राहत नाही. प्राप्त विषयाशी एकनिष्ठ राहून जिद्द, चिकाटीच्या जोरावर कैसे तगडे संशोधन करता येते याचे अलीकडच्या काळातील ठळक उदाहरण म्हणून डॉ. अशोक बिडगर आणि त्यांच्या महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अभ्यास या शोधग्रंथाकडे पाहता येईल.
Reviews
There are no reviews yet.