Description
२०१९च्या निवडणुकांनंतर सुधारून अद्ययावत केलेल्या या अत्यावश्यक पुस्तकात, भारतातील एक अत्यंत धाडसी आणि मर्मदृष्टी असलेला पत्रकार, विचारवंत देशाचा लेखाजोखा मांडत आहे. द्वेषाने असहिष्णुतेने चर्चेची, संवादाची, अन् सामाजिक सलोख्याची जागा घेतली असल्याने स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला निर्माण झालेल्या धोक्यांचा शोधही हा पत्रकार घेतो. निवडून आलेले लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमं आणि अन्य संस्था कशा अपयशी ठरल्या आहेत याची चिकित्सा करताना लोकशाहीचं नुकसान भरून काढण्याच्या मार्गाकडेही हे पुस्तक निर्देश करतं.
‘हा आपल्या काळाचा आरसा आहे आणि हा काळ कमालीचा धोकादायक आहे.’
-अनुराधा रामन, द हिंदू
‘फाजील धर्माभिमान आणि द्वेष यांचा सामना करताना शांत राहू पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक वाचायला हवं. सरकारवर टीका करताना स्वतःवरच सेन्सॉरशिप लादणाऱ्या प्रसारमाध्यमांनी आपल्यामधील धैर्याचा शोध कसा घ्यावा याचे मार्गदर्शन हे पुस्तक करतं. भारत आणि भारतातील लोक आपल्या डोळ्यांदेखत कसे बदलले याचा हा दस्तावेज आहे.’
– प्रिया रामानी, स्क्रोल डॉट इन
‘भय, खोटेपणा आणि गुंडगिरीची ही गोठवून टाकणारी काळोखी रात्र पार करून सकाळची उब आपल्याला स्पर्श करेल त्यावेळी हे पुस्तक त्या काळाचं स्मरण करून देणारा प्रामाणिक रिपोर्ताज ठरेल. काही वेळा रवीश कुमार निराशावादी वाटतो; परंतु या पुस्तकाचा परिणाम सकारात्मक आहे. हे पुस्तक करुणा, बांधिलकी आणि आशा प्रज्वलित करतं.
प्रकाश के. रे.. द वायर
‘लोकांनी निष्क्रिय राहू नये यासाठी हे पुस्तक सावध करते आणि सर्वांनी ठामपणे उभं राहावं यासाठी साद घालतं. देशाच्या सद्यस्थितीबद्दल निराश असणाऱ्या प्रत्येकानं हे पुस्तक अवश्य वाचायला हवं अस मी सुचवेन.’
– चित्रा अंथेम, इंफाळ फ्री प्रेस
Reviews
There are no reviews yet.