Description
भल्याबुऱ्याची पारख करताना सापेक्षतेचा साक्षेप असणे अगत्याचे ठरते. राजकारणात तर हे सारभूत तत्व मानले पाहिजे. अन्यथा सर्वांनाच राजकारणाचा संन्यास घ्यावा लागेल. असे पूर्वी कधी झालेले नाही आणि पुढेही कधी होणार नाही. मानवजात आहे तोवर तरी हे होणे नाही. हां चांगल्या चांगल्यांच्या मते गोंधळ असला तरीही तो सनातन आहे आणि चिरंतनही आहे. म्हणूनच त्यावर सातत्याने भाष्य होत राहते. ‘इति अलम’ म्हणून ते संपत नसते. चाणाक्षांच्या आणि चाणक्यांच्याही हाती याहून अधिक काही नसते. उलट, यासाठी अशांना ‘कौटिल्य’ ही वैकल्पिक संज्ञा मात्र वागवावी लागते.

Reviews
There are no reviews yet.