Description
कृत्रिम प्रज्ञेचा वापर वाढत असलेल्या जगात मानवाला स्वतःचा विकास कसा करता येईल या आजच्या काळातील महत्त्वाच्या आर्थिक प्रश्नावर ‘द ग्रेट गॅरी कास्पारोव्हने’ केलेलं मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं आहे. मानवी प्रज्ञा ही कृत्रिम प्रज्ञेपेक्षा श्रेष्ठ कशी आहे याबाबत मांडणी करताना हे पुस्तक आपल्या विचारांना सकारात्मक दिशा दाखवतं. यंत्रमानवांशी लढण्यापेक्षा, स्वयंचलनाला विरोध करण्यापेक्षा आपण हे पुस्तक वाचून भविष्याला गवसणी घालायला हवी.
– वॉल्टर इसाकसन (‘द इनोव्हेटर’ चा लेखक)
मे १९९७ मध्ये जेव्हा आय.बी.एम.च्या ‘डीप ब्लू’ या महासंगणकाने जगातील सर्वांत महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह याला हरवलं, तेव्हा संपूर्ण जगाला धक्का बसला होता. कधीही न थकणाऱ्या, निर्दयी प्रतिस्पर्ध्याबरोबर खेळताना त्याचा अनुभव कसा होता, तेव्हा त्याने काय चुका केल्या, तसेच परिस्थिती त्याला प्रतिकूल कशी होत गेली, याबाबत या पुस्तकामध्ये गॅरी कास्पारोव्ह त्याची बाजू पहिल्यांदा मांडत आहे. मात्र हे पुस्तक तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. खेळाचा धागा पकडून कास्पारोव्ह कृत्रिम प्रज्ञेवर खूप मौलिक विचार मांडतो, कृत्रिम प्रज्ञेला सामोरं जाताना त्यानं कशी मानसिक तयारी केली, याची माहिती देतो. त्याचं सखोल ज्ञान आणि परिस्थितीचं विश्लेषण करताना त्याचा अनोखा दृष्टिकोन यांच्यामुळे ‘डीप थिंकिंग’ हे पुस्तक वाचकांचं मतपरिवर्तन करणारं, भविष्याकडं पाहायची सकारात्मक दृष्टी देणारं जबरदस्त साधन झालं आहे. प्रत्येकानं हे पुस्तक वाचलंच पाहिजे.
कृत्रिम प्रज्ञेबाबत कास्पारोव्हचा दृष्टिकोन हा त्याच्या वैयक्तिक कटू अनुभवावर आधारित असला, तरी सकारात्मक आहे. ज्ञानवर्धक तर आहेच; पण आकर्षकदेखील आहे. कृत्रिम प्रज्ञा हेच आपलं उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे असं सिलिकॉन व्हॅलीमधील धनाढ्य उद्योगपतींनी सांगणं वेगळं. मात्र हेच वाक्य जर अशी व्यक्ती सांगत असेल, ज्यानं आपलं सर्वस्व पणाला लावून संपूर्ण जगासमोर सर्वांत शक्तिशाली संगणकाशी दोन हात केले आहेत, तर त्या वाक्याला निश्चित महत्त्व प्राप्त होते.
चार्ल्स डुहीग
Reviews
There are no reviews yet.