गणितशास्त्र, मानसशास्त्र इत्यादीसारखी कोणतीही ज्ञानशाखा घेतली, तरी तिचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावंच लागतं. नेमकं तेच परिवर्तनशास्त्राच्या बाबतीतही आहे. स्वतः शिकून घेतल्याशिवाय कोणीही या शास्त्रांमधलं काहीही दुसऱ्याला शिकवू शकणार नाही. संस्कृती, नीती, इतिहास, धर्म, सण, उत्सव, देवता इत्यादींच्या बाबतीत गांभीर्यानं अध्ययन केल्याशिवाय कुणालाही त्या क्षेत्रांत निर्दोष परिवर्तन घडवता येणार नाही.
खरं तर, परिवर्तनाच्या प्रक्रियेत काम करणारांच्या व्यक्तिमत्त्वांत शास्त्र आणि कला यांचा एकात्म असा समन्वय व्हायला पाहिजे, त्यांची एक रेशमी गुंफण व्हायला पाहिजे. आणि जसे शास्त्राचं शिक्षण घेतलं पाहिजे, तसंच कलेचंही शिक्षण घेतलं पाहिजे. निदान अंतःस्फूर्तीनं का असेना, जाणीवपूर्वक स्वतःची स्वतः काही तपश्चर्या तरी करायलाच हवी !
Reviews
There are no reviews yet.