Description
कागदाचा शोध लागला नसताना लेखन कसं केलं जायचं ?
मौखिक शब्द अक्षररूपात कसे आले ?
पुस्तकांनी मानवी जगण्याला आकार कसा दिला ?
प्राचीन काळी नाइल नदीच्या किनारी उगवणाऱ्या पपायरस वनस्पतीपासून गुंडाळया अर्थात भूर्जपत्रं तयार केली जायची. त्यापासून तेव्हाची पुस्तकं तयार व्हायची. या मौलिक उत्पादनाकरता भांडणं, लढाया व्हायच्या.
पुस्तक – निर्मिती आणि जतन करण्याची कहाणी जितकी अस्पष्ट आहे तितकीच ती नाट्यमय आहे. या कहाणीत रक्तपात आहे, राजकारण आहे, संघर्ष आहेत आणि पछाडलेपणही आहे. ती आपल्याला अलेक्झांडर द ग्रेटच्या युद्धसंग्रामात नेते. क्लिओपात्राच्या राजवाड्यांमधून फिरवून आणते. व्हेसूव्हीयस ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जमिनीखाली गाडल्या गेलेल्या शहराचा शोध घ्यायला लावते. हायपेशियाचा खून का झाला असावा, असा प्रश्न विचारते. . .
आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेल्या, विविध पुरस्कारप्राप्त ‘ पपायरस’ पुस्तकामध्ये लेखिका आयरीन वालेहो यांनी प्राचीन काळातलं साहित्यिक जग, पुस्तकं जतन करण्यासाठी झालेले धाडसी प्रयत्न, तेव्हाची ग्रंथालयं, तिथल्या पद्धती यांचा मागोवा घेतला आहे. हे करताना त्यांनी पुस्तक – चोर, नकलाकार, ग्रंथपाल, पुस्तकविक्रेते, लेखक आणि श्रीमंत राजकारणी तसचं सर्वसामान्य गरीब लोक यांच्या विलक्षण कथा या कथनात गुंफल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.