Description
डॉ. सुरेंद्रनाथ सेन या बंगाली इतिहास संशोधकाच्या या ग्रंथाचा तब्बल अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर मराठी अनुवाद प्रसिद्ध होत आहे, हि गोष्ट अतिशय मोलाची ठरेल. मराठ्यांची प्रशासन व्यवस्था सामान्य मराठी माणसापर्यंत पोचण्यासाठी या ग्रंथाचे मोल मोठे आहे, कारण मराठ्यांच्या प्रशासनाचा केंद्रबिंदू सामान्यातला सामान्य माणूस होता हि गोष्ट या ग्रंथाद्वारे सिद्ध झाली आहे.
मराठ्यांचे प्रधानमंडळ, अर्थव्यवस्था, संरक्षण खाते, राजदरबार, समाजरचना, महसूल व्यवस्था, तुरुंग, पोलीस, न्याय व्यवस्था इ. गोष्टींचा सखोल आढावा घेणारा हा ग्रंथ मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासकाला व सामान्य वाचकाला निश्चितपणे महत्त्वपूर्ण ठरेल यात शंका नाही.
Reviews
There are no reviews yet.