नवे तमाशे (लोकनाट्य)

25.00

1 in stock

पुस्तकाचे नाव नवे तमाशे (लोकनाट्य)
लेखक अण्णा भाऊ साठे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ३८४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २८० ग्रॅम

Description

‘वगनाट्य’ व ‘लोकनाट्य’ यांबद्दल समाजात संभ्रम आहे. तमाशात सादर होणारा वग हा अश्लील पद्धतीने सादर केला जात होता. अण्णा भाऊ साठे यांनी त्यात बदल करून सामाजिक समस्यांवर, जनमानसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित समस्यांवर ‘नवे तमाशे’ या मथळ्याखाली सादर केलेल्यांना ‘लोकनाट्य’ असं नामकरण करत विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या लोकनाट्यांत शेतकरी, कामकार यांचे विषय त्यांनी मांडले आहेत. मुंबई कोणाची ? ती मराठ्यांची की गुजरात्यांची ? हा वाद निर्माण झाला तेव्हा त्यांनी त्यावर ‘मुंबई कोणाची’ हे लोकनाट्य लिहिलं. त्यातला झगडा जरी रंजक असला, तरी त्यातलं वास्तव श्रोत्यांना खिळवून ठेवत होते नई त्यावर विचार करायला लावत होतं नि त्यातून प्रबोधनही होत होतं. ‘पेंग्याचे लगीन’ हे कोकणातील ‘मांडकस’ या वेशभूषेवर भाष्य करणारं सामाजिक समस्येवरचं लोकनाट्य आहे. अशी अण्णाभाऊंनी एकूण चौदा लोकनाट्यं लिहिली. ही सारी लोकनाट्यं प्रबोधनात्मक आहेत. लोकनाट्याचं हे बदललेलं रुपडं लोकांनी स्वीकारलं आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नवे तमाशे (लोकनाट्य)”

Your email address will not be published. Required fields are marked *