युगंधर

675.00

1 in stock

पुस्तकाचे नाव युगंधर
लेखक शिवाजी सावंत
ISBN 978-81-7421-081-4
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १०६४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६४० ग्रॅम

Description

श्रीकृष्ण! गेली पाच हजार वर्षे भारतीय स्त्री-पुरुषांच्या व्यक्त-अव्यक्त मनांचा तळठाव व्यापून दशांगुळे शेष उरलेली एक सशक्त विभूतिरेखा – एक युगपुरूष!

श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात ते मुख्यत:  श्रीमदभागवत, महाभारत, हरिवंश व काही पुराणांत. या प्रत्येकाट गेल्या हजारो वर्षांत सापेक्ष विचारांची, मनगढंत पुटंच पुटं चढली. त्याचं तांबूस-नीलवर्णी, सावळं, गर्भातच दुर्लभ रंगसूत्रांचे संस्कार घेतलेलं, श्रीयुक्त म्हणजे सुंदर रुपडं घनदाट झालंय. ते ही अतर्क्य चमत्कारांचे स्रोतच स्त्रोत – नकळत्या भाबडेपणी टाकल्यामुळं झालेलं आहे.

आज तर श्रीकृष्ण क्रमश: वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर जाऊन बसलाय. आजच्या ‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा श्रीकृष्ण हा पहिला उदगार आहे! जसा आभाळातील सूर्य कधी शिला वा बासा होत नाही तसाच हा महाभारताचा कथा कणा असलेला तत्त्वज्ञ वीर, आज तर नाहीच उद्याही शिळा होणार नाही. जन्मत: दुर्मिळ रंगसूत्रं लाभल्यामुळं त्याच्या चक्रवर्ती जीवनचरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे.

श्रीकृष्णाच्या मूळ जीवन संदर्भाची मोडतोड न करता त्याचं ‘युगंधरी ‘ रूप बघता येईल का ? त्याच्या स्वच्छ नीलवर्णी जीवन सरोवराचं दर्शन घेता येईल का ? गीतेत त्यानं विविध जीवनयोग नुसतेच सांगितले का ? की हातच्या दिव्य, गतिमान सुदर्शनासारखे प्रत्यक्ष जगूनही दाखविले ? त्याच्या जीवन सरोवरातील हजारो वर्ष दाटलेलं शेवाळ तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारलं तर त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “युगंधर”

Your email address will not be published. Required fields are marked *