Description
ब्रिटिश सत्तेच्या विरोधात दंड थोपटून स्वत:चं राज्य निर्माण करणाऱ्या रांगडा रामोशी राजे उमाजी नाईक यांच्या साहसाची चरितगाथा सांगणारी ही ऐतिहासिक कादंबरी.
गरीब जनतेला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजू उमजू नये म्हणून ब्रिटिशांनी उमाजी नाईक यांना दरोडेखोर ठरवलं. तरीही उमाजी राजे डगमगले नाहीत. ते शेवटपर्यंत ‘राजे’ पदाला शोभेसेच वागत राहिले. त्यांचा हा इतिहास अत्यंत स्फूर्तिदायक, प्रेरक आहे. दुर्लक्षित राहिलेल्या ह्या क्रांतिकारक सच्च्या देशभक्ताची ओळख या पुस्तकातून होणार आहे.
काळाच्या पडद्याआड राहिलेले एक बुलंद ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व ‘उमाजी राजे’ या कादंबरीच्या स्वरूपातून मराठी वाचकांपर्यंत पोहोचले आहे.

Reviews
There are no reviews yet.