Description
वास्तव, अनुभव आणि प्रतिभा असा त्रिवेणी संगम झाल्यावर किती श्रेष्ठ दर्जाची कलाकृती निर्माण होऊ शकते, याचे अण्णा भाऊ साठे यांची ‘फकिरा’ ही कादंबरी एक ठसठशीत उदाहरण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ही कृती अर्पण करून अण्णा भाऊ साठे यांनी मोठेच औचित्य साधले आहे. स्वकीयांची सावकारशाही व परकीयांची साम्राज्यशाही यांना फकिराने दिलेला झुंज १९४२ च्या प्रतिसरकारशी नाते सांगणारी आहे, यात संशय नाही. समग्र गावगाडा उभा करण्याचे कसब अण्णा भाऊ साठे यांच्याइतके कोणालाच साधलेले नाही.
Reviews
There are no reviews yet.