Description
‘ तुकारामायण‘, ‘ मीडिया ट्रायल ऑन तुकोबा‘ आणि ‘डियर तुकोबा‘ अशा तीन रुपात विनायक होगाडे यांनी त्यांना झालेले तुकाराम दर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे. ते अत्यंत प्रभावी आणि गुंतवून टाकणारे तर आहेच, खेरीज ते आपल्या मनात विचारांचे हिंदोळ – कल्लोळ मातविणारे आहे. चारशेंवर वर्षांआधी तुकोबांनी आपल्यात परलेली सांस्कृतिक जनुके आजही आपल्यात वाहती असल्याने तुकोबा समकालीनच आहेत, हे ढळढळीत सत्य होय. म्हणूनच होगाडे यांनी काळाची काही मोडतोड, खेचाखेच केली आहे ऐसे अजिबातही वाटत नाही. आज ज्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि मानसिक स्थितीत एक समूह म्हणून आपन जगत आहोत, त्या वर्तमानात तुकोबांची अशी आठवण होणे, करणे आवश्यकच आहे, हे होगाडे यांनी फार प्रत्ययकारी प्रकारे केले आहे. आधीच्या कविता आणि अखेरीचे स्फुट यांच्या बळावर ही ‘ट्रायल’ फार सामर्थ्याने उभी करून होगाडे यांनी फार वेधक आणि महत्त्वाचे सांस्कृतिक जागरण मांडले आहे. या जागरणाचा एक श्रोता म्हणून मी अंत:करणापासून त्यांचे अभिनंदन व स्वागत करतो
Reviews
There are no reviews yet.