Description
गोष्टीची सुरवात होते सातव्या शतकात सम्राट हर्षवर्धनाच्या काळात. स्थाण्वीश्वर जवळच्या बौद्ध विहारातील प्रमुख भिक्कू सारिपुत्ताकडे आकाश दर्शनासाठी येणारा हौशी मुलगा रोहित याला आकाशात एक विलक्षण दृश्य दिसले, त्याने पळत जाऊन सारिपुत्तांना बोलावले. आपल्या वाचनाच्या आणि निरीक्षणाच्या आधारे त्यांनी त्या घटनेचे महत्त्व ओळखले व राजाच्या कानावर ही गोष्ट घातली. पुढे राजाच्या आवाहनावरून त्यांनी रोहितच्या मदतीने ह्या घटनेच्या सविस्तर नोंदी ठेवल्या. योगायोगाने त्या नोंदी ताम्रपत्रांवर व्यवस्थित कोरलेल्या एका उत्खननात सापडतात विसाव्या शतकात, प्राच्यविद्याविशारद तात्यासाहेब भागवत आणि शास्त्रज्ञ अविनाश नेने दोघे एकत्र येऊन त्याचा अर्थ लावण्यात यश मिळवतात. आणि मग हळु हळु शास्त्रज्ञांना पृथ्वीवर येऊ घातलेल्या संकटाची चाहूल लागते. हे संकट नेमके काय असते… ते केव्हा येते… त्यापुढे पृथ्वीचा निभाव लागतो का…. ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात. अनेक शतकांनंतर, कादंबरीच्या शेवटच्या भागात.
Reviews
There are no reviews yet.