फकिरा

150.00

Out of stock

पुस्तकाचे नाव फकिरा
लेखक अण्णा भाऊ साठे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १५१
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

‘फकिरा’ विषयी थोडं सांगावं, म्हणून लिहित आहे. ते असं, की ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेन सत्याचं – जीवनाचं दर्शन नसेल, तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत, असा माझा अनुभव आहे.  कारण सत्याला जीवनाचा आधार नसला, की प्रतिभा अंधारातील आशाप्रमाणं निरुपयोगी ठरते.  मग कितीही प्रयत्न करून त्यात प्रतिबिंब दिसत नाही आणि कल्पकता निर्बल होते.  अगदी पंखविरहित पाखराप्रमाणं ती उडूच शकत नाही.  मी तरी अशी भरारी मारण्यात भलताच जड आहे.

जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते, तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते  आणि अनुभूतीला सहानभूतीची जोड नसेल.  तर आपण का लिहितो, याचा पत्ताच लागणं शक्य नाही.

म्हणून मी लिहिताना सदैव सहानुभूतीनं लिहिण्याचा प्रयत्न करतो.  कारण ज्यांच्याविषयी मी लिहितो, ती माझी माणसं असतात.  त्यांची मुर्वत ठेवूनच मला लिहिणं भाग पडतं.

हा ‘फकीरा’ ही माझा होता.  जे साकार नाही, त्याला आकार देण्याचं सामर्थ्य माझ्या ठाई नाही.  जे पाहिलं, अनुभवलं, ऐकलं; तेच मी लिहिलं आहे.  त्यातून हा ‘फकीरा’ निर्माण झाला आहे.  डोंगरात नई त्याच्या पायथ्याला विखुरलेलं फकीराचं कर्तृत्व एकत्र करून हा इमला उभारला एवढचं !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फकिरा”

Your email address will not be published. Required fields are marked *