Description
इतिहासाची स्वत: पुनरावृत्ती होईल का ?
” 26 जानेवारी 1950 ला भारत एक स्वतंत्र देश होईल (हर्षध्वनी). त्याच्या स्वातंत्र्याचे काय होईल ? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले की त्यास ते गमवावे लागेल ? हा तो पहिला विचार माझ्या मनात येतो. भारत कधी स्वतंत्र देश नव्हता असे नाही. मुद्दा ऐसा आहे की, त्याने आपले स्वातंत्र्य एकदा गमाविलेले होते. ते पुन्हा दुसऱ्या वेळी गमवावे लागेल ? हा तो विचार आहे जो मला भविष्यसंबंधी चिंताक्रांत करतो. भारताने केवळ एकदा आपले स्वातंत्र्य गमाविले त्यामुळे नव्हे, तर ते आमच्या काही अश्रद्धावान व देशद्रोही लोकांमुळे ते गमाविले ही वस्तुस्थिती मला अधिक चिंताक्रांत करते.
इतिहासाची स्वत: पुनरावृत्ती होईल का ? हा तो विचार आहे जो मला बैचेन करीत आहे. जाती आणि संप्रदायाच्या स्वरुपातील आपल्या जुन्या शत्रूच्या व्यतिरिक्त आपल्याकडे वेगवेगळे आणि परस्पर विरोधी राजकीय मतांचे राजकीय पक्ष राहणार आहेत. ह्या वस्तुस्थितीच्या जाणीवेमुळे ही बैचेनी अधिक गंभीर होत आहे. भारतीय लोक त्यांच्या संप्रदायापेक्षा देशाला श्रेष्ठ मानतील किंवा ते संप्रदायाला देशाला श्रेष्ठ मानतील. मला माहीत नाही. परंतु एवढे निश्चित की, जर राजकीय पक्षांनी देशापेक्षा संप्रदायाला श्रेष्ठ मानले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा अडचणीत येईल, आणि कदाचित ते कायमचे नष्ट होईल. ह्या परिणामाचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्वजण ठाम उभे राहिले पाहिजे. आपण स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याचा निर्धार केला पाहिजे.” (हर्षध्वनी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संविधान सभेत 25 नोव्हेंबर 1949 रोजी दिलेले भाषण )
Reviews
There are no reviews yet.