Description
तुम्हाला मोठे बदल हवे असतील तर छोट्या बदलांनी सुरूवात करा.
सध्याचं दमछाक करणारं फिटनेसचं वेड विसरून जा.
जेमतेम काही आठवड्यापर्यंतच टिकणारे निर्धार विसरून जा .
अपराधीपणा वाटून घेणं विसरून जा. वाईट वाटून घेणं विसरून जा.
तुम्हाला वाटतं त्याहून तुमच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणंण कितीतरी अधिक सोपं आहे.
सिलिकॉन व्हॅलीतील दंतकथा बनून गेलेले आणि स्टैनफोर्डमधील आदर्श बिहेवियर डिझाइन ल्याबचे संस्थापक बीजे फॉग यांनी सवयी तयार होण्याची सांकेतिक लिपी उलगडली आहे. छोट्या सवयींच्या पद्धतीवर त्यांनी तब्बल वीस वर्षे संशोधन केलं आहे. 60,000 हून अधिक लोकांनी वापरलेली त्यांची छोट्या सवयींची पद्धत वर्तनबदलाची गुरू किल्लीच आहे. ती आजपर्यंत तुम्हाला वर्तन बदलाविषयी नेहमीच जे सांगितलं गेलं आहे, त्याच्या बरोबर विरुद्ध स्वरूपाची आहे. वर्तनबद्दल इच्छाशक्तीवर अवलंबून नाही. तो लहान गोष्टींनी सुरूवात करण्यावर आणि ती गोष्ट चांगली वाटून घेण्याजोगी बनवण्यावर अवलंबून आहे.
कोणतीही सवय पार पाडण्यास सुरूवात करा.
ती छोटी बनवा.
तुमच्या आयुष्यात नैसर्गिकरित्या ती कुठं बसते ते शोधून काढा.
आणि तिच्या वाढीसाठी तिचं पोषण करा.
छोट्या सवयी कोणालाही त्यांच्या आयुष्यातील आतापर्यंतचं उत्तम वर्ष मिळवण्यासाठी मदत करतील. मग ती तुमची अधिक चांगली झोप लागण्याची इच्छा असो, वजन घटवण्याची, अधिक हुशारीनं काम करण्याची किंवा मुलांच्या सान्निध्यात अधिक काळ राहणारे पालक बनण्याची इच्छा असो . बीजे फॉग हे सवयींवरच्या संशोधनाचे जनक असून, त्यांच्या सल्ल्यामुळे आधीच माझं आयुष्य बदलून गेलं आहे.
डॉ. रंगन चटर्जी , ‘ फील बेटर इन 5’ चे लेखक.
सखोल संशोधन करून लिहिलेलं आणि अत्यंत व्यवहार्य पुस्तक .
” द हॅपीनेस प्रोजेक्ट ” या उत्तम खपाच्या पुस्तकाच्या लेखिका
Reviews
There are no reviews yet.